

Illegal Bauxite Mining
sakal
राशिवडे बुद्रुक : राधानगरी तालुक्यातील दुर्गमानवाड व पडसाळी या संवेदनशील परिसरात राजरोसपणे झाडे तोडून बॉक्साइट उत्खनन सुरू आहे. पर्यावरणाची हानी होत असल्याने हे प्रकार थांबवावेत, अन्यथा आंदोलन करू, अशा आशयाचे निवेदन राधानगरी गौण खनिज बचाव समितीचे अध्यक्ष सचिन पाटील यांनी खनिकर्म अधिकारी, जिल्हाधिकारी व पर्यावरण मंत्र्यांना दिले आहे.