गडहिंग्लज : ‘गडहिंग्लज साखर कारखान्याच्या (गोडसाखर) चौकशीचा तृतीय विशेष लेखापरीक्षकांचा अहवाल आला आहे. कारखान्यात १६ कोटी ६५ लाख ७६ हजार ६२४ रुपयांचे आर्थिक व्यवहार नियमबाह्य पद्धतीने झाले आहेत..Differences between Congress and NCP : वाळव्यात काँग्रेस-राष्ट्रवादीतले मतभेद कायम.त्याला सकृतदर्शनी जबाबदार असणाऱ्या तत्कालीन अध्यक्ष डॉ. प्रकाश शहापूरकरांसह सात अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी’, असे या अहवालात नमूद केले असल्याची माहिती ‘गोडसाखर’चे सभासद व सेवानिवृत्त कामगार संघटनेचे अध्यक्ष शिवाजी खोत यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, ‘गोडसाखर’ची कलम ८३ नुसार चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे..त्याला सकृतदर्शनी जबाबदार असणाऱ्या तत्कालीन अध्यक्ष डॉ. प्रकाश शहापूरकरांसह सात अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी’, असे या अहवालात नमूद केले असल्याची माहिती ‘गोडसाखर’चे सभासद व सेवानिवृत्त कामगार संघटनेचे अध्यक्ष शिवाजी खोत यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, ‘गोडसाखर’ची कलम ८३ नुसार चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.खोत म्हणाले, ‘गडहिंग्लज साखर कारखान्याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी प्रादेशिक सहसंचालकांकडे (साखर) केली होती. त्यानुसार तृतीय विशेष लेखापरीक्षक धनंजय पाटील यांची नेमणूक करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. .कारखान्याकडून चौकशीसाठी दप्तर वेळेत उपलब्ध करून दिले नाही. त्यामुळे चौकशीसाठी आठ महिने लागले. लेखापरीक्षकांनी १८ नोव्हेंबरला प्रादेशिक सहसंचालकांना चौकशी अहवाल सादर केला आहे.’ते पुढे म्हणाले, ‘कारखान्याने ऊस तोडणी व वाहतुकीचे १२ कोटी ६५ लाख ७६ हजार ८२४ रुपये नियमबाह्य अॅडव्हान्स अदा केले आहेत. तसेच विस्तारीकरणासाठी चार कोटी रुपये नियमबाह्य अॅडव्हान्स संचालक मंडळाच्या सभेपूर्वी अदा केले आहेत. या अनियमित, अयोग्य व नियमबाह्य आर्थिक व्यवहारास सकृतदर्शनी कारखान्याचे तत्कालीन अध्यक्ष डॉ. प्रकाश शहापूरकर, तत्कालीन कार्यकारी संचालक औंदुबर तांबे, सुधीर पाटील, महावीर घोडके, तत्कालीन सेक्रेटरी मानसिंग देसाई, बापूसाहेब रेडेकर, रणजित देसाई, लक्ष्मण देसाई जबाबदार असल्याचे अहवालात नमूद केले आहे.’ यावेळी बाळासाहेब लोंढे, सुरेश पाटील, अरुण लोंढे, लक्ष्मण देवार्डे, महादेव मांगले, पांडुरंग कदम, संभाजी बुगडे, दिनकर खोराटे, आदी उपस्थित होते. दरम्यान, डॉ. प्रकाश शहापूरकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिक्रियेस नकार दिला..Sangli sugar school : कारखाना स्तरावर मुलांसाठी ‘साखर शाळा’ भरवण्यात येणार.हसन मुश्रीफच जबाबदार...सभासदांनी विश्वास दाखवत कारखान्याची एकहाती सत्ता दिली. त्याला आमदार हसन मुश्रीफ यांची पुण्याईसुद्धा कारणीभूत ठरली. कारखान्यातील प्रत्येक गोष्टीची नैतिक जबाबदारी मुश्रीफ यांचीच आहे. मात्र, कारखान्यात घडणाऱ्या गोष्टींकडे त्यांनी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून दुर्लक्ष केले. त्यामुळे गडहिंग्लज कारखान्याच्या परिस्थितीला हसन मुश्रीफच जबाबदार आहेत, असा आरोप शिवाजी खोत यांनी केला..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.