Kolhapur Zilla Parishad : बेकायदेशीर वृक्षतोड केला अन् सरपंचपद घालवून बसला, विभागीय आयुक्तांचा कोल्हापूर जिल्हा परिषदेला दिला आदेश

Kolhapur gram panchayat action : बेकायदेशीर वृक्षतोड प्रकरणात सरपंचावर मोठी कारवाई करण्यात आली असून विभागीय आयुक्तांनी कोल्हापूर जिल्हा परिषदेला आदेश दिले आहेत. सविस्तर बातमी वाचा.
illegal tree felling case shahuwadi kolhapur

illegal tree felling case shahuwadi kolhapur

esakal

Updated on

Shahuwadi village sarpanch dismissed news : मौजे म्हाळसवडे (ता. शाहूवाडी) येथील गायरानामधील बेकायदेशीरपणे केलेल्या वृक्षतोडीकडे ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केले. विनापरवाना वृक्षतोड केल्याप्रकरणी पोलिस ठाण्यात ठेकेदारावरुध्द तक्रार दाखल करण्याच्या सूचना उपवनसंरक्षकांनी दिल्या होत्या. मात्र, ही बाब गांभीर्याने न घेतल्याने पणुंद्रे-म्हाळसवडेचे (ता. शाहूवाडी) सरपंच सुनील ज्ञानदेव कांबळे यांना अपात्र ठरविण्यात आले आहे. याबाबतचे आदेश विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी जिल्हा परिषदेला दिले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com