

Illegal Weapon Sale via Mobile Status
esakal
Kolhapur Police Crime News : कर्नाटकातून आणलेल्या हत्यारांची खुलेआम विक्री करणाऱ्या संदेश सर्जेराव पानारी (वय २६, रा. हणमंतवाडी, ता. करवीर, सध्या रा. नेर्ली) याला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. त्याच्याजवळून तीन तलवारी, सहा एडके अशी हत्यारे जप्त करण्यात आली. स्वतःच्या स्टेटसवर हत्यारांचे फोटो ठेवून त्याची विक्री करीत असल्याचे समोर आले. दहशत माजविण्यासाठीही त्याने हत्यारांचा वापर केल्याचे तपासात पुढे आले आहे.