"सेवा सोसायटी आता डिजिटल करून बिनचूक काम करण्यास प्राधान्य दिले जाणार आहे. विषमुक्त अन्नधान्यासाठी जीआय पद्धत सुरू झाली आहे."
कोल्हापूर : देशात दूध उत्पादन आणि मागणी यात मोठी तफावत आहे. त्यातूनच दूध भेसळ होत असल्याची जाहीर कबुली सहकारमंत्री बाबासाहेब पाटील (Babasaheb Patil) यांनी दिली. त्यामुळे येथून पुढे विषमुक्त अन्नधान्य देणे याला प्राधान्य असेल. त्यासाठी सहकार चळवळीतून प्रयत्न करायचे आहेत. अडचणीतील संस्थांना ऊर्जितावस्था आणायची आहे, असे मंत्री पाटील यांनी येथे सांगितले.