esakal | स्वच्छ सर्व्हेक्षणमध्ये इचलकरंजीच्या मानांकनात सुधारणा; पण कोण आहे मोहिमेबाबत उदासीन...
sakal

बोलून बातमी शोधा

Improvement Of Ichalkaranji's Rating In A Clean Survey Kolhapur Marathi News

स्वच्छ सर्व्हेक्षणमध्ये इचलकरंजी शहराच्या मानांकनात काहीशी सुधारणा झाली असली तरी पुढील काळात स्वच्छतेबाबत अधिक प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी पालिकेवर आली आहे.

स्वच्छ सर्व्हेक्षणमध्ये इचलकरंजीच्या मानांकनात सुधारणा; पण कोण आहे मोहिमेबाबत उदासीन...

sakal_logo
By
पंडित कोंडेकर

इचलकरंजी : स्वच्छ सर्व्हेक्षणमध्ये इचलकरंजी शहराच्या मानांकनात काहीशी सुधारणा झाली असली तरी पुढील काळात स्वच्छतेबाबत अधिक प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी पालिकेवर आली आहे. पालिकेने यापूर्वी स्वच्छतेबाबत विविध उपक्रम राबविले आहेत. पण त्यामध्ये सातत्य ठेवण्याची आवश्‍यकता आहे. स्वच्छतेचा विषय केवळ प्रशासन पातळीवर गांभिर्याने घेतला जातो. राजकीय पातळीवर मात्र नेहमीच उदासिनता राहिली आहे. 

केंद्र शासनाने जाहीर केलेल्या स्वच्छ सर्व्हेक्षणमध्ये इचलकरंजी शहराचा देशपातळीवर 89 वा क्रमांक आला. गतवर्षीच्या तुलनेने यंदा मानांकनात सुधारणा झाली आहे. पण ही सुधारणा नक्कीच समाधानकारक नाही. स्वच्छतेच्या प्रश्‍नावर होणाऱ्या खर्चाचा विचार केल्यास यामध्ये आणखी सुधारणा होणे अपेक्षीत होते. केवळ गुण मिळवण्यासाठी नव्हे तर शहर कायमचे स्वच्छ व सुंदर राहण्यासाठी पालिकेचे सातत्याने प्रयत्न राहणे आवश्‍यक आहे. पण तसे होताना दिसत नाही. स्वच्छ सर्व्हेक्षणवेळी प्रशासनाकडून जय्यत तयारी केली आहे. नंतर मात्र पुन्हा यंत्रणा सुस्त होते. 

स्वच्छतेबाबत पालिकेचे अगदीच काम निराशाजनक नाही. पण प्रभावी नाही. स्वच्छ सर्व्हेक्षणाच्या निमित्ताने काही सकारात्मक सुधारणा झाल्या आहेत, हे नाकारुन चालणार नाही. घंटागाडीची आता नागरिकांना सवय झाली आहे. पण अद्याप कचरा संकलीत करताना काही त्रुटी आहेत. यामध्ये कचरा विलगीकरण प्रक्रियेबाबत गांभीर्याने घेण्याची आवश्‍यकता आहे. शौचालययुक्त शहर योजना प्रभावीपणे राबवण्यात आली. त्यामुळे पूर्वीपेक्षा आता याबाबत चांगला बदल झाला आहे. पूर्वी शहरात सातत्याने कचरा साचून राहत होता. त्यामध्ये चांगले बदल झाल्याचे दिसून येत आहे. पालिकेचा आरोग्य विभाग सातत्याने विविध उपक्रम राबवित आहे. 

स्वच्छ सर्व्हेक्षणमध्ये भरारी घेण्यासाठी यापुढे अधिक प्रभावीपणे काम करण्याची आवश्‍यकता आहे. यापूर्वी राहीलेल्या त्रुटी दूर करण्यासाठी विशेष मोहिम राबवण्याची आवश्‍यकता आहे. सार्वजनिक स्वच्छता हा नागरिकांच्या आरोग्याशी निगडीत विषय असतो. यासंदर्भातील कामेही पारदर्शकपणे होणे गरजेची आहेत. स्वच्छतेवर खर्च होणारा निधी वाया जाता कामा नये. यावर कटाक्षाने सत्ताधाऱ्यांनी लक्ष देण्याची आवश्‍यकता आहे. स्वच्छतेसंदर्भातील प्रत्येक काम दर्जेदार करण्यावर भर देण्याची तितकीच जबाबदारी आहे. नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत आस्था निर्माण झाली पाहिजे. त्यासाठी पालिकेकडून जनप्रबोधन करणे आवश्‍यक आहे. स्वच्छ सर्व्हेक्षण हा केवळ प्रशासनाचा भाग नसून ती राजकर्त्यांचीही जबाबदारी आहे, याचे भान ठेवल्यास पुढील काळात नक्कीच मानांकनात चांगली सुधारणा होईल. 

स्वच्छतागृहांची दुरवस्था 
शहरात सार्वजनिक स्वच्छतागृहांची दूरवस्था आहे. अनेक ठिकाणची स्वच्छतागृहे एका रात्रीत पाडून टाकली आहेत. नागरिकांच्या तक्रारीनंतरही गांभीर्याने घेतलेले नाही. स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेचा मक्ता दिला जातो. पण स्वच्छता होत नाही, हे वास्तव चित्र आहे. याकडेही गांभीर्याने पाहण्याची आता वेळ आली आहे. 

संपादन - सचिन चराटी 

kolhapur

loading image
go to top