
Delay In Treatment Kolhapur : वेतवडे फाटा (ता. गगनबावडा) येथे दीड महिन्यांपूर्वी झालेल्या अपघातातील जखमी शहिदा जहाँगीर नाकाडे (वय ५८, रा. तिसंगी) यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, खर्च परवडत नसल्याने नातेवाइकांनी मंगळवारी दुपारी त्यांना सीपीआरमध्ये आणले. रुग्णवाहिकेतून स्ट्रेचरवर उतरविलेल्या रुग्णाला तातडीने अपघात विभागात घेण्यात आले नाही. रुग्णवाहिकेतील कृत्रिम श्वासोच्छ्वासावर बराच वेळ राहिल्याने त्यांचा स्ट्रेचरवरच मृत्यू झाल्याचा आरोप करत नातेवाइकांनी डॉक्टरांना धारेवर धरले. यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले होते.