
Kolhapur News Today : भुदरगड तालुक्यातील गारगोटी, खानापूर, कलनाकवाडी, आंबवणे आदी गावांतील तब्बल २० जणांचा भटक्या कुत्र्यांनी चावा घेऊन जखमी केले. हल्लेखोर तीन कुत्री असून, त्यापैकी एक पिसाळलेले आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. कुत्र्याच्या हल्ल्यात खानापूर येथील वयोवृद्ध विलास घरपणकर (वय ८०) हे गंभीर जखमी झाले. कुत्र्याने त्यांच्या तोंडावर चावे घेतले आहेत.