
Kolhapur Crime News : कोल्हापूर जिल्ह्यात काल (ता. २१) एका दिवसात ५ जणांनी विविध ठिकाणी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. हातकणंगले येथील एका वृद्धाने रेल्वे रुळावर झोपून आत्महत्या केली तर नरंदेत एका महिलेने राहत्या घरी गळफास घेतला. तर शाहूवाडी येथील एका महिलेने विष प्राशन केले होते तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. वडणगे येथील ८१ वर्षीय वृद्धाने आजाराला कंटाळून आत्महत्या केली तर मडिलगे खुर्द येथील २१ वर्षीय तरूणाने जीवन संपवले.