
पोलिसालाच गुंडानी चोप दिला, कोल्हापुरातील घटना
esakal
Kolhapur : लक्षतीर्थ वसाहतीतील शाहू चौकात रस्त्यात दुचाकीवर केक कापून वाढदिवस करताना हटकल्याच्या रागातून रेकॉर्डवरील तीन गुंडांनी एका पोलिसाला मारहाण केली. या तिघांनी हवालदार पंढरीनाथ इश्राम सामंत यांना कॉलर पकडून धक्काबुक्की करत सरकारी कामातही अडथळा आणला. याप्रकरणी पोलिसांनी या तिघांविरोधात गुन्हा दाखल करत अटक केल्याची माहिती पोलिस निरीक्षक श्रीराम कन्हेरकर यांनी दिली.