
Central Water Commission : केंद्रीय जल आयोगाने १५ ऑगस्टपर्यंत आलमट्टी धरणातील पाणी पातळी ५१७ मीटरपर्यंतच ठेवावी, असे निर्देश दिले आहेत. मात्र, जून महिन्यातच आलमट्टीमधील पाणीसाठा ५१७ मीटर होता. आज पाणी पातळी ५१८ मीटरवर पोहोचली असून, सध्या धरणात एकूण क्षमतेच्या ७२ टक्के पाणीसाठा आहे. कर्नाटक सरकारने जल आयोगाच्या नियमांचे उल्लंघन केले असून, आलमट्टीमधील पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यात सरकारला अपयश आले, अशी टीका इंडिया आघाडीच्या बैठकीत करण्यात आली.