
Kolhapur Aghori Incident
ESakal
कोल्हापूर जिल्ह्यातील इंगळी गावाच्या हद्दीत अघोरी प्रकार केल्याची घटना उघडकीस आली आहे. ऐन दिवाळीतच अघोरी पूजा केल्याचा प्रकार उघड झाल्याने नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. इंगळी गावाच्या कमानी जवळच जनावराचं काळीज पांढऱ्या फडक्यात ठेवून त्या भोवती कुंकू, गुलाल, लिंबू , केळी आणि केळीचं कट केलेलं झाड ठेवण्याचा प्रकार उघड झाला आहे.