esakal | अकरावी प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीत विज्ञान शाखेची कट ऑफ लिस्टमध्ये वाढ
sakal

बोलून बातमी शोधा

Admission

अकरावी प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीत विज्ञान शाखेची कट ऑफ लिस्टमध्ये वाढ

sakal_logo
By
संदीप खांडेकर : सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : अकरावी प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीत विज्ञान शाखेची कट ऑफ लिस्टमध्ये काही महाविद्यालयांत सरासरी एक ते दोन टक्‍क्‍यांनी वाढ, तर एक टक्क्याने घट झाली. वाणिज्य शाखेत सरासरी पाॅइंट ४० टक्क्यांनी वाढ व २३.८ टक्क्यांनी घट झाल्याचे स्पष्ट झाले. दुसऱ्या फेरीतील ५ हजार २७८ विद्यार्थ्यांनी मंगळवार पर्यंत (ता. २८) सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत निवड झालेल्या महाविद्यालयांत प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन सहायक शिक्षण संचालक सुभाष चौगुले यांनी केले आहे. दरम्यान, अकरावीच्या एकूण १४ हजार ६८० पैकी ४ हजार १०५ जागा रिक्त राहिल्या.

गतवर्षीच्या तुलनेत यंदा कट ऑफ लिस्ट आकडा कमी झाला. शहरातील काही महाविद्यालयांत चढ-उताराचा आलेख स्पष्टपणे जाणवला. पहिल्या फेरीत त्याची प्रचिती आल्यानंतर दुसऱ्या फेरीतही तीच स्थिती राहिली. विज्ञान, वाणिज्य व कला शाखेकडे विद्यार्थ्यांचा ओढा कमी झाला. बहुतांश विद्यार्थ्यांनी व्यावसायिक अभ्यासक्रमांकडे पावले वळवली. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी शहरातील महाविद्यालयांकडे पाठ वळवली. दुसऱ्या फेरीतच जागा शिल्लक राहिल्याने हीच फेरी अंतिम ठरली. त्यामुळे अॅलाॅट झालेल्या कनिष्ठ महाविद्यालयांत प्रवेश घेणे विद्यार्थ्यांना बंधनकारक आहे. त्यानंतर कोणताही प्रवेश अकरावी केंद्रिय प्रवेश समितीच्या वतीने केला जाणार नाही. दुसऱ्या फेरीत ९ हजार ३८३ पैकी ५ हजार २७८ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे. तिन्ही शाखांत एकूण ४ हजार १०५ जागा रिक्त राहिल्या आहेत.

हेही वाचा: महाराष्ट्राची शान वाढली, ‘यूपीएससी’त १२ टक्के मराठी तरुण यशस्वी

विविध शाखांत इतर प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे अर्ज आले नसल्याने खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना इतर प्रवर्गातून प्रवेश देण्यात आला आहे. यात कला इंग्रजी माध्यमात ११, मराठी माध्यम १६५, वाणिज्य इंग्रजी ४४४, मराठी ३५८, तर विज्ञान शाखेत १५२४ विद्यार्थ्यांचा समावेश आहे, अशी माहिती सहायक शिक्षण संचालक सुभाष चौगुले यांनी दिली.

loading image
go to top