
कोल्हापूर : रुग्णांची वाढती संख्या; ५०२ नवे बाधित, ५७१ कोरोनामुक्त
कोल्हापूर : जिल्ह्यात दहा दिवसांत कोरोनाबाधितांच्या संख्येत झालेली वाढ कायम असताना आज नवे ५०२ बाधित सापडले. पाच बाधितांचा मृत्यू झाला असून यात तीन वर्षांच्या बालकाचाही समावेश आहे. त्यामुळे कोरोनाचे भय ठळक आहे. अशात एका दिवसात ५७१ व्यक्ती कोरोना मुक्त झाल्याने दाखल रुग्णसंख्या नियंत्रणात असल्याचे दिसत आहे.
हेही वाचा: SBI चा नियम 1 तारखेपासून बदलणार! ग्राहकांना होणार मोठा फायदा
आठ दिवसात अपवाद वगळता बाधितांची संख्या दिवसाला सहाशेच्या आसपास आहे. यात नव्याने सापडणाऱ्यांमध्ये सौम्य लक्षणांच्या बाधितांचे प्रमाण जास्त आहे. ज्यांना कोरोना व्यतिरिक्त अन्य आजारांची लक्षणे गंभीर आहेत अशा व्यक्तीवर रुग्णालयात उपचार घेताना कोरोना चाचणी करावी लागते यात बाधित आलेल्या व कोरोनासह अन्य विकाराचे उपचार सुरू आहेत यातील अती गंभीर अवस्थेत असलेल्या पाच जणांचा मृत्यू झाला. सीपीआरमध्ये पुरुषासह वृद्धेचा समावेश आहे.आयजीएम रुग्णालयात दोम वृद्धांचा, कोल्हापूर शहरातील ३ वर्षीय बालकांचा खासगी रुग्णालयात मृत्यू झाला आहे. या सर्वांना तीव्र स्वरूपाचा फुप्फुसाचा गंभीर संर्सग होता. त्यासोबत मधूमेह, कर्करोग, नस, हृदयविकार अशी लक्षणे होती. आज ५७१ व्यक्ती कोरोनामुक्त झाले. त्यामुळे जिल्ह्यातील २८९ शासकीय खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत, ही संख्या नियंत्रणात आहे. त्यामुळे वैद्यकीय यंत्रणेवरील ताणही कमी झाला आहे.
हेही वाचा: तरुणांना जॉबची सुवर्णसंधी! फेअरपोर्टलचे कार्यालय आता पुण्यात
थंडीमुळे घराघरात आजारी व्यक्ती आहेत. ज्यांना कोरोनासदृश लक्षणे आहेत अशांना कोरोना चाचणीचा सल्ला डॉक्टर देत आहेत. त्यानुसार आठ दिवसात लक्षणे असणाऱ्यांच्या चाचणीची संख्या वाढली यात नवे बाधित सापडण्यास मदत झाली. यात ज्यांना गंभीर व्याधी आहेत वय जास्त आहे अशा व्यक्ती बाधित सापडल्यास त्यांनाच उपचारासाठी दाखल व्हावे लागत आहे.
बाधित वाढण्याची भीती
शासकीय सुट्टीमुळे खासगी रुग्णालये बंद होती. त्यामुळे दोन दिवसांत चाचण्यांचे प्रमाण कमी झाले. त्यामुळे नव्याने बाधित सापडण्याचे प्रमाण शंभर ते दीडशेने कमी झाले आहे. मात्र, सोमवारनंतर कोरोना चाचण्यांचे प्रमाण आणखी वाढणार आहे. त्यामुळे बाधितांची संख्या आणखी वाढते की काय अशी शंका व्यक्त होत आहेत.
Web Title: Increasing Corona Patients 502 New 571 Corona Free
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..