कृषी विद्यापीठाने प्रस्तावित केंद्रासाठी कृषी विभागाकडे पाच हेक्टर क्षेत्राची मागणी केली आहे. लवकरच हे क्षेत्र कृषी संशोधन केंद्राकडे हस्तांतरणासाठी प्रयत्न सुरू आहेत.
राधानगरी : राहुरीस्थित महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून (Mahatma Phule Agricultural University) प्रस्ताव मंजूर झाल्याने आगामी काळात कोईमत्तूरच्या धर्तीवर राधानगरीत स्वतंत्र ऊस प्रजनन केंद्र उभारणी दृष्टिपथात आली आहे. प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी राज्य शासनाकडे सादर झाला आहे. पालकमंत्री प्रकाश आबिटकर (Prakash Abitkar) यांनी प्रस्तावित केंद्र मंजुरीसाठी आश्वासक पाऊल उचलल्याने, पाडेगाव मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्रानंतर हे दुसरे ऊस प्रजनन केंद्र सुरू होणार आहे.