Inflation : जगणंच महागलं...

महागाईचे सर्वसामान्यांना चटके; राहणीमानावर परिणाम, गॅस सिलिंडरला सबसिडीची मागणी
Inflation
InflationSakal

दुधापासून ते तेलापर्यंत आणि घरगुती गॅस सिलिंडरपासून ते पेट्रोलच्या दरवाढीने महागाईचे चटके सर्वसामान्यांना सोसावे लागत आहेत. हातावरचे पोट असलेल्या सर्वसामान्यांचा जगण्याचा प्रवाहच बदलला आहे. काहींची बचत बंद झाली, तर काहींना कर्ज काढावे लागत आहे. काहींनी प्रवास, पर्यटन, मनोरंजनाला फाटा दिला आहे. मुलांच्या शिक्षणाला मुरड घालावी लागते तर मुलींच्या हौसेची समजूत काढावी लागते. महागाई वाढली; पण महागाईच्या पटीत पगार मात्र वाढले नाहीत.

एका चौकोणी कुटुंबीयांचा महिन्याचा खर्च

  • वीज बिल किमान ४०० रुपये

  • पाणी बिल किमान ३०० रुपये

  • केबल किमान २५० रुपये

  • दूध ८७० रुपये (कमीत कमी दिवसाला अर्धा लिटर)

  • घरगुती गॅस सिलिंडर १०१९ रुपये

  • गॅस गिझरसाठी सिलिंडर ८०० ते १००० रुपये

  • मोबाईल रिचार्ज कुटुंबात तीन मोबाईल किमान १००० रुपये

  • धान्य किमान ६ हजार रुपये

  • भाजीपाला १००० ते १२०० रुपये

  • फळे - औषधे १००० रुपये

  • पेट्रोल - कुटुंबात दोन दुचाकी - मासिक ४००० रुपये

  • शैक्षणिक साहित्य - क्लासची फी - मासिक ३००० रुपये

  • घरभाडे किंवा फ्लॅटचा हप्ता किमान ४००० ते १० हजार

  • सेव्हिंग-मुलीच्या, मुलाच्या भविष्यासाठी २ हजार

  • सण, समारंभ, लग्न, पाहुणे ५०० ते १००० रुपये

  • केशकर्तन, सौदर्यप्रसाधने, आवश्‍यक वस्त्रे १०००

  • घर चालविण्यासाठी मासिक खर्च २७ हजार ३२०

सहा महिन्यांतील दरवाढ

  • गहू किलो ३ ते ४ रुपये

  • खाद्यतेल लिटरला ४० ते ५० रुपये

  • पेट्रोल २० रुपये लिटरला

  • मसूरडाळ किलोला ८० रुपयांवरून १०० रुपये

  • साखर किलोला ३६ रुपयांवरून ४० रुपये

  • रवा, मैदा, आटा किलोला ४ रुपये

  • शाबू किलोला २ रुपयांनी उतरला

  • शेंगदाणा - दर टिकून किलोला १२० ते १४० रुपये

  • साबण वडी मागे ४ रुपये वाढले

  • चुरा ५० रुपयांवरून ६३ रुपये

  • दाढी ५० रुपये, केशकर्तन १०० रुपये झाले ४० रुपये वाढ

डब्बल ड्युटी करावी लागते

पेट्रोल-गॅसचे दर वाढल्यामुळे दिवसभर रिक्षा फिरविण्यासाठी किमान १५० रुपये इंधनासाठी खर्च करावे लागतात. यातून होणारा व्यवसाय पाहता दिवसाला १०० ते १५० रुपये राहतात. महिन्याला साधारण तीन ते साडेचार हजार मिळतात. यात घर चालविणे शक्य होत नाही. त्यामुळे डब्‍बल ड्युटी करावी लागते. घरगुती गॅस सिलिंडर, वीज बिले वाढली आहेत. त्यामुळे जगणंच मुश्‍कील झाले आहे. त्यातून मानसिकता बिघडते, आजार वाढून खर्चही वाढत आहेत.

- सुनील कदम, रिक्षाचालक.

मनोरंजन, पर्यटन बंद झाले

पेट्रोल, खाद्यतेल, गॅस सिलिंडर, मुलांचा शैक्षणिक खर्च, वीज बिल, धान्य दरात वाढ झाल्यामुळे हौसमौजेला लगाम घालावा लागतो. औषध किंवा खर्च वाढल्यास हप्ता थकवावा लागतो. विकेंडचे मनोरंजन, पर्यटन बंद झाले आहे. महागाई जितकी वाढते त्या पटीत पगार वाढत नाहीत. त्यामुळे अनेक खासगी नोकरदारांची ही स्थिती आहे. जीवनाची बजेट कोलमडत आहे.

- नितीन गायकवाड, खासगी नोकरदार.

सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले

जीवनावश्‍यक वस्तूंच्या दरात वाढ झाली आहे. यापूर्वी घरगुती गॅस सिलिंडर ४००-५०० रुपयांना मिळत असून त्यातही सबसिडी होती. सध्या १०१९ रुपयांना गॅस सिलिंडर होऊन ही सबसिडी नाही. महागाईचा फरक आमच्यावर पडत नसला तरीही आमच्या पगारातून टॅक्स रुपातून कपात होते. त्याचा फायदा सर्वसमान्यांना द्यायला पाहिजे.

- राजेंद्र कोरे, शिक्षक.

राहणीमानावर थेट परिणाम

कोविडमध्ये अनेकांचे व्यवसाय बंद होते. त्यातून बाहेर पडताना मुश्‍कील झाले. आता महागाईने कहर केला आहे. गॅस सिलिंडरची सबसिडी बंद झाली आहे, पेट्रोल, तेलाचे दर वाढल्यामुळे त्याचा परिणाम संसारावर होतो. शैक्षणिक खर्च वाढत आहे. वाढत्या महागाईमुळे राहणीमान उंचविण्यापेक्षा खाली जाण्याची धोका अधिक आहे. त्यामुळे महागाई कमी करण्याकडे सरकारने पावले उचलली पाहिजेत.

- सुनीता यादव, गृहिणी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com