'या' त्र्याहत्तर गावांत आहेत 61 प्रकारची मूळ वाणं!

'या' त्र्याहत्तर गावांत आहेत  61 प्रकारची मूळ वाणं!

कोल्हापूर : वनस्पतींच्या नावाने परिचित असणाऱ्या 73 गावांच्या भेटीतून 61 प्रकारच्या मूळ वाणांचा खजिना आढळला आहे. येथील निसर्गमित्र संस्थेतर्फे आंतरराष्ट्रीय वनस्पती आरोग्य वर्ष व स्थानिक फळे व भाजीपाला संवर्धन वर्षानिमित्त जिल्ह्यातील वनस्पतीच्या नावाने परिचित गावांना भेटी दिल्या. त्यातून अनेक फळे, पालेभाज्या, वनौषधी, कडधान्य, स्थानिक पिके आदी वनस्पतीतील हा मूळ वाणांचा खजिना स्थानिक नागरिकांकडून जतन केल्याचे स्पष्ट झाले. या सर्वच वाणांचे लोकसहभागातून जतन करून संवर्धन संस्था करणार आहे.

अनेक ज्येष्ठ नागरिक व कृतिशील शेतकऱ्यांनी विविध वाणांचे जतन केले आहे; मात्र अनेक वाणांचे महत्त्व, उपयुक्ततेबद्दल माहितीचा अभावही आहे. अनेक गावांतून परसबागेचे अस्तित्व कमी झाले आहे. शेती व शेतीपूरक व्यवसाय करण्याकडे नव्या पिढीचा कल आहे; पण हे प्रमाण अल्प आहे. स्वच्छता व कचरा व्यवस्थापनाविषयी थोडीफार जागृती असली तरी कृतीचा अभाव आहे. आपत्ती व्यवस्थापनाविषयी सखोल माहितीचा अभाव आहे, आदी बाबी या भेटीदरम्यान लक्षात आल्या. त्यामुळे याबाबत लवकरच कृतिशील कार्यक्रम आखला जाणार आहे. या मोहिमेत दिलीप पेटकर, पराग केमकर, मोहन जाधव, खंडेराव हेरवाडे, विनायक सनगर, अस्मिता चौगुले, नरेंद्र भद्रापुरे, रणजित कालेकर, विजय रानमाळे, अवधूत वीर, शहाजी माळी, आनंदा ठोंबरे, दिनकर मोहिते यांचा सहभाग होता.

अशा आहेत वनस्पती व गावे

म्हाळुंगे-म्हाळुंग, तिरपण-तीवर, साळवण-साळवण, साळीचं भात, वडगाव-वड, पिंपळगाव-पिंपळ, बेलेवाडी-बेल, कवठेपिरान-कवठ, वेखंडवाडी-वेखंड, रिंगेवाडी-रिठा (रिंगणी), जांभूळवाडी-जांभूळ, ऐनी-ऐन, आपटी-आपटा, शेंद्री-शेंद्री, रुई-रुई, कणेरी-कणेरी, फणसवाडी-फणस, आंबेवाडी-आंबा, चिंचेवाडी-चिंच, सैनिक टाकळी-टाकळी, मिरवेल-मिरवेल, पळसंबे-पळस, हळदी-हळद, नेरले-मका, आल्याची वाडी-आले, बोरबेट-बांबू बेट, आजरा-आजरा घनसाळ, नरसिंह वाडी-वांगी, तुडये-रताळे, अर्जुनवाड व अर्जुनी-अर्जुन, काटेभोगाव- चिबूड, भुये-हनुमान फळ, गोरंबे-हुंब, मौसम-पपनस, खेडसिंगी, शरोळ-गोंदणी, पेठशिवापूर-कॉफी, जैताळ-मोह.

Edited By- Archana Banage

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com