
संदीप खांडेकर
कोल्हापूर : शालेय क्रीडा स्पर्धेची उत्सुकता शिगेला पोहोचली असताना शासनाच्या मंजूर अनुदानात क्रीडा प्रकारांचे आयोजन डोकेदुखीचा मुद्दा ठरणार आहे. पंचांचे मानधन, नाश्ता, जेवण ते आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यात विविध संघटनांच्या नाकीनऊ येणार आहे. प्रत्येक खेळासाठी तालुका स्तरावर १० हजार, जिल्हास्तरावर पाच खेळांसाठी ३० हजार, तर विभागस्तरावरील खेळांच्या आयोजनासाठी १५ हजारांचे अनुदान संयोजकांसाठी त्रेधातिरपीट उडवणारे ठरणार आहे. त्यामुळे सरकारने अनुदानात वाढ करावी, अशी मागणी होत आहे.