
कोल्हापूर - तीन लाखापर्यंतचे पीक कर्ज बिनव्याजी देण्याचा निर्णय जिल्हा बॅंकेने घेतला आहे. तसा ठराव बॅंकेच्या शुक्रवारी (ता. 5) होणाऱ्या सर्वसाधारण सभेत करण्यात येणार आहे. याचा फायदा जिल्ह्यातील दोन लाख 52 हजार 252 शेतकऱ्यांना होणार आहे.
बॅंकेची 82 वी वार्षिक सभा शुक्रवारी (ता. 5) बॅंकेचे अध्यक्ष ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली शाहू मार्केट यार्ड परिसरातील श्री शाहू सांस्कृतिक मंदिरात दुपारी एक वाजता होणार आहे.
पाच वर्षांपूर्वी अडचणीत असलेल्या बॅंकेला अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत व काटकसरीने कारभार करत संचालक मंडळांने या बॅंकेला गतवैभव मिळवून देत प्रगतिपथावर आणले आहे. पाच वर्षांमध्ये अध्यक्ष व उपाध्यक्ष यांसह संचालक मंडळातील कुणीही एकही गाडी वापरली नाही. तसेच बॅंकेच्या खर्चाने एकही दौरा केला नाही. भत्ता नाही की कोणत्याही हॉटेलमधून पाहुणचार नाही. हे सगळं करीत असताना संस्था जगल्या पाहिजेत टिकल्या पाहिजेत या भावनेतून राजकारण विरहित कारभार केला. त्यामुळेच आज बॅंकेने गरूड भरारी घेतली आहे.
दृष्टीक्षेपात पाच वर्षातील प्रगती
107 कोटींच्या संचित तोट्यावरून 137 कोटीचा नफा
अडीच हजार कोटीवरून साडेसहा हजार कोटी ठेवी
सॉफ्ट लोन, साखर तारण, बफर स्टॉक, साखर निर्यात अनुदानापोटी कर्जाची सुविधा
1998 साली सहकार क्षेत्रातील एटीएम सुरू करणारी पहिली बॅंक
दोन लाख 52 हजार 210 शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांचे अपघाती विमा सुरक्षाकवच
जिल्ह्यातील 1860 संस्थांमध्ये काम करणाऱ्या सर्वच म्हणजे 1021 गट सचिवांसाठी पाच लाखाचे वीम कवच
बॅंकेच्या कर्मचाऱ्याचा दुर्दैवाने कोरोनाने मृत्यू झाल्यास 21 लाख रुपये,
अपघाती मृत्यू झाल्यास 22 लाख रुपये
नैसर्गिक कारणांने मृत्यू झाल्यास 16 लाख रुपये विमाकवच
या संचालक मंडळाच्या कारकीर्दीतच कर्मचाऱ्यांना बोनस व सभासद संस्थाना लाभांश
हे पण वाचा - एका नेत्याच्या आदेशावरून गोकुळची सभा उधलून लावली
संपादन - धनाजी सुर्वे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.