esakal | International Mountain Day: पर्वतपूजन प्राचीन परंपरा..! कोल्हापूरात आहेत वीस प्रकारचे पर्वतपूजन

बोलून बातमी शोधा

International Mountain Day article dr amar adke

आजवरच्या गेल्या ४० वर्षांच्या भटकंतीत १६० प्रकारच्या पर्वतपूजनाच्या नोंदी आढळल्या आहेत.

International Mountain Day: पर्वतपूजन प्राचीन परंपरा..! कोल्हापूरात आहेत वीस प्रकारचे पर्वतपूजन
sakal_logo
By
डॉ. अमर अडके

कोल्हापूर : जगभरात आज (११ डिसेंबर) विविध उपक्रमांनी आंतरराष्ट्रीय पर्वत दिन साजरा केला जाईल. संयुक्त राष्ट्रसंघाने २००२ पासून या दिनाला प्रारंभ केला असला तरी पर्वतपूजनाची प्राचीन परंपरा आपल्याकडे आहे आणि आजही त्या-त्या ठिकाणच्या भूमिपुत्रांनी ती जपली. 
 

डोंगर किंवा पर्वतक्षेत्र म्हणजे आपला पाण्याचा स्त्रोत. आजही मोठ्या प्रमाणावर जैवविविधता असणारी बहुतांश संपन्न जंगले पर्वतक्षेत्रातच टिकून आहेत. पर्वतीय क्षेत्राची स्वतःची अशी एक खास व वैविध्यपूर्ण सांस्कृतिक परंपरा आहे. पर्वतांचे हे महत्त्व लक्षात घेऊन संयुक्त राष्ट्रसंघाने २००२ पासून ११ डिसेंबरला आंतरराष्ट्रीय पर्वत दिनाला प्रारंभ केला असला तरी आपल्याकडे फार प्राचीन काळापासून या गोष्टींना महत्व दिले गेले आहे.

हेही वाचा- फॅन्सी नंबरसाठी मोजावे लागणार जादा पैसे

आजवरच्या गेल्या ४० वर्षांच्या भटकंतीत १६० प्रकारच्या पर्वतपूजनाच्या नोंदी आढळल्या आहेत. त्यात कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केला तर वीस प्रकारचे पर्वतपूजन आपल्याकडे होते. जिल्ह्यात प्रामुख्याने उत्तर पन्हाळा, दक्षिण पन्हाळा आणि चिक्कोडी अशा तीन डोंगररांगा आहेत. त्यातही अनेक अपरिचित डोंगर शिखरे आहेत.

पन्हाळ्यातील वाघजाईचे पठार असेच आहे की जिथे वाघजाईची पूजा प्रत्येक वर्षी होते. पन्हाळा पश्‍चिम भागातील कापलिंग असे ठिकाण आहे की आजही भर दुपारी येथे तेवीस ते चोवीस डिग्री सेल्सियसच्या वर कधीच तापमान जात नाही. उगवाई पूजनाची परंपराही कायम आहे. प्रत्येक डोंगर शिखरावर वैशिष्ट्यपूर्ण मंदिरे आहेत आणि या देवता त्या त्या डोंगर शिखरांच्या संरक्षक देवता आहेत. देव दिपावली, कार्तिक पौर्णिमा, वसुबारस, वाघबारस अशा विविध निमित्ताने या ठिकाणची पर्वतपूजनाची परंपरा आजही जपली गेली आहे.

डॉ. अमर अडके,अध्यक्ष, कोल्हापूर डिस्ट्रिक्‍ट माउंटेनिअरिंग असोसिएशन


संपादन- अर्चना बनगे