esakal | बानगेत पाच कोटी रुपयांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे कुस्ती संकुल
sakal

बोलून बातमी शोधा

wrestlers

बानगेत पाच कोटी रुपयांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे कुस्ती संकुल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

म्हाकवे : कुस्ती पंढरी अशी ओळख असलेल्या बानगे (ता. कागल) येथिल नामदार हसन मुश्रीफ आंतरराष्ट्रीय निवासी कुस्ती संकूलासाठी पहिल्या टप्प्यात एक कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकिय मंजुरी मिळाली. नामदार हसन मुश्रीफ यांच्यामुळेच हा निधी मिळाला असून पाच कोटी रुपयांचे आत्याधुनिक, सर्व सोयी सुविधायुक्त हे कुस्ती संकूल असेल. अशी माहिती आंतरराष्ट्रीय मल्ल, उप-महाराष्ट्र केसरी रवींद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. येथील जय भवानी तालमीत पत्रकार परिषदेत झाली.पत्रकार परिषदेस राजू पाटील, संतराम पाटील, संजय कदम, अमर पाटील वस्ताद तुकाराम चोपडे, विलास पाटील,धनाजी पाटील उपस्थित होते.

हेही वाचा: Kolhapur Rain: राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे पुन्हा उघडले

पै.रविंद्र पाटील म्हणाले," कुस्तीपंढरी म्हणून बानगे गावची ओळख आहे. रविंद्र पाटील, रणजीत नलवडे, कौतुक डाफळे,प्रितम खोत, सचिन पाटील,भगवान जठार यांच्यासारखे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पैलवान गावाने घडविले आहेत. येथील जय भवानी तालमीच्या छोट्या खोलीत सुमारे शंभर मुले व पंचवीस मुली सराव करतात. अपुऱ्या सोयीसुविधासह छोट्याशा खोलीत सराव करणे अडचणीचे होते. नामदार मुश्रीफांचे कुस्तीवरील प्रेम व मल्लांची गरज ओळखून त्यांनी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कुस्ती संकूलास तातडीने निधी दिला.

राजर्षी शाहू महाराज यांनी राजाश्रय दिलेल्या कुस्ती खेळाला मुश्रीफ यांनी प्रोत्साहन देण्याचे काम केले. कुस्ती संकुलाच्या बांधकामाची सुरवात दसऱ्याच्या मुहूर्तावर करणार आहे. या आंतरराष्ट्रीय कुस्ती संकूलात तीन मजली दोन इमारती होतील. दोनशे मुला-मुलींच्या सरावाची सोय संकूलामध्ये होईल.

हेही वाचा: कळणे: ऐन गणेशोत्सवात विजेचा लपंडाव सुरु, नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण

पहिल्या इमारतीमध्ये शंभर बाय पंचावन फूटाचा माती आखाडा, दुसऱ्या मजल्यावर निवासी मुलांमुलींची राहण्याची सोय. तर तिसऱ्या मजल्यावर मल्लांना सरावासाठी आॕलंपिक दर्जाची दोन कुस्ती मॕट असणार आहेत.

दुसऱ्या इमारतीमध्ये मल्लासाठी पंचावन बाय नव्वद रुंदीची प्रशस्त मेस, दुसऱ्या मजल्यावर आत्याधुनिक दर्जाची व्यायामशाळा तसेच सोनाबाथ, स्टीमबाथची सुविधा असणार आहे. तिसऱ्या मजल्यावर मल्लांना राहण्याची सोय असणार आहे. संकूलाच्या रिकाम्या जागेत व्हॉलीबॉल व बास्केटबॉलचे मैदान असेल.कोल्हापूर जिल्ह्यात ग्रामीण भागात सर्व सोयी सुविधायुक्त कुस्ती संकुल मंजूर झाल्याचा फायदा जिल्ह्यातील शेकडो खेळाडूंना मिळणार आहे.

हेही वाचा: Kolhapur : ऐतिहासिक देखाव्यातून प्रबोधनाची वाट

एक एकर जमीन दान

बानगे येथील कै. अण्णासाहेब केशव पाटील यांचे कुस्ती खेळावर जीवापाड प्रेम. त्यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव राजू पाटील, आंतरराष्ट्रीय मल्ल रवींद्र पाटील, निवास पाटील यांनी स्वतःच्या मालकीची सुमारे एक कोटी रुपयांची एक एकर जमीन कुस्ती संकूलासाठी मोफत दिल्याची माहिती राजू पाटील यांनी दिली. तसेच गरज भासल्यास आणखीन जागा देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

"कुस्तीवर जीवापाड प्रेम करणाऱ्या बानगे गावात कुस्ती संकुल मंजूर झाल्याचे समाधान वाटते. या कुस्ती संकूलामध्ये अॉलंपिक दर्जाचे मल्ल निश्चितच घडतील."

- तुकाराम चोपडे (वस्ताद)

loading image
go to top