esakal | आंतरजातीय लग्नाने मुलीच्या वडिलांचा संताप; रागाच्या भरात उचलले टोकाचे पाऊल
sakal

बोलून बातमी शोधा

Crime

आंतरजातीय लग्नाने मुलीच्या वडिलांचा संताप; उचलले टोकाचे पाऊल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बाजार भोगाव (कोल्हापूर) : एका युवकाने केलेल्या आंतरजातीय विवाहाच्या रागातून त्याच्या वडिलाचे अपहरण करून त्यांना जातिवाचक शिवीगाळ करत बेदम मारहाण केल्याप्रकरणी सहा जणांवर ॲट्रॉसिटी दाखल झाली आहे. याप्रकरणी अवघ्या बारा तासांत संशयितांना अटक केली.

कळे पोलिसांतून प्राप्त माहिती अशी,

कसबा बीड (ता. करवीर) येथील युवक किशोर आनंदा कांबळे याने गावातीलच युवतीशी पळून जाऊन आंतरजातीय विवाह केला आहे. शनिवारी हे नवविवाहीत जोडपे जिल्हा पोलिसप्रमुख कार्यालयात हजर झाले. करवीर पोलिस ठाण्यात त्यांचा जबाब नोंदवला. तथापि युवतीच्या वडिलांसह नातेवाइकांना हा विवाह मान्य नव्हता. त्यामुळे त्यांना मुलगीचा ताबा हवा होता.

किशोरचे वडील आनंदा बापू कांबळे (कसबा बीड, ता. करवीर) हे सेंट्रींग कॉन्ट्रॅक्टर असून पोहाळे तर्फ बोरगाव (ता. पन्हाळा) येथे नातलगांच्या घराच्या बांधकामासाठी गेले होते. तेथून मुलीच्या नातलगांनी आनंदा कांबळे यांचे अपहरण केले. जातीवाचक शिवीगाळ व लाथाबुक्क्यांनी तसेच काठीने बेदम मारहण करून जखमी अवस्थेत करवीर पोलिस ठाण्याजवळ सोडून दिले. मारहाणीचा प्रकार कोणालाही सांगू नये, यासाठी जीवे मारण्याची धमकीही दिली. याप्रकरणी मुलीचे वडील बाजीराव बाबूराव यादव (कसबा बीड), अमोल रंगराव पाटील (कोतोली), विनायक श्रीपती सावंत, अक्षय अनिल सावंत (दोघेही गारगोटी), उमेश श्रीपती सावंत, अजित दिनकर पाटील (दोघेही कोलोली) यांना कळे पोलिसांनी अवघ्या बारा तासांत जेरबंद केले. सर्वांना जिल्हा व सत्र न्यायाधीश विठ्ठलानी यांच्यासमोर हजर केले असता १५ जुलैपर्यंत पोलिस कोठडी दिली.

हेही वाचा- 35 वर्षाच्या संघर्षाला न्याय मिळेल का? मुश्रीफ यांच्यासमोर मोठे आव्हान

उपविभागीय पोलिस अधिकारी रामेश्वर वैंजणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक रणजित पाटील, प्रवीण शिंदे, ए. के. सांगले, संदीप पाटील, सचिन पाटील तपास करीत आहेत. जखमी कांबळे यांच्यावर कोल्हापुरातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

loading image