जलसंपदा विभागाने कागल व भुदरगड तालुक्यांतील ६५ गावांतील शेतकऱ्यांकडे वीस हजार रुपयांहून अधिक थकबाकी असणाऱ्या शेतकऱ्यांच्या सात-बारा पत्रकी बोजा नोंद करण्याचे प्रस्ताव महसूल विभागाकडे पाठवले आहेत.
म्हाकवे : चिकोत्रा नदी, वेदगंगा नदी (वाघापूर ते नानीबाई चिखली) तसेच काळम्मावाडी दूधगंगा धरण (Kalammawadi Dam) निढोरी शाखेच्या कालव्यातून पाणी वापर करणाऱ्या ६५ गावांतील पाच हजार रुपयांपासून वीस हजार रुपये थकबाकी असणाऱ्या १५ हजार शेतकऱ्यांकडे (Farmers) पाच हजार ते वीस हजारांमधील एक कोटी २५ लाख रुपये सिंचन पाणीपट्टी थकबाकी आहे.