Kolhapur Farmhouse Raid : फार्महाऊसवरील छाप्यात पोलिसांचे ‘तोडपाणी’ सात पोलिस चौकशीच्या फेऱ्यात ; संशयितांना मदत केल्याचा प्रकार

Farmhouse Raid in Dindnerli Raises Questions : दिंडनेर्लीतील फार्महाऊसवरील छाप्यानंतर संशयितांना मदत केल्याचे आणि प्रकरणात फेरफार केल्याचे आरोप झाल्याने इस्पुर्ली पोलिस ठाण्यातील सात पोलिसांची चौकशी सुरू करण्यात आली आहे.
Kolhapur Farmhouse Raid

Kolhapur Farmhouse Raid

esakal

Updated on

कोल्हापूर : फार्महाऊसवर टाकलेल्या छाप्यानंतर तोडपाणी करण्याऱ्या इस्पुर्ली पोलिस ठाण्याच्या एका उपनिरीक्षकासह सात पोलिसांचा कारनामा उघडकीस आला आहे. या प्रकाराची चौकशी करण्याचे आदेश थेट पोलिस अधीक्षकांनी दिले असून, करवीरचे उपअधीक्षक आप्पासो पवार यांनी जबाब नोंदविण्याचे काम सुरू केले आहे. यापूर्वीही फार्महाऊस मालकांकडून पैसे उकळल्याच्या तक्रारी आल्याने तिघांवर निलंबनाची कारवाई झाली होती.

इस्पुर्ली पोलिसांच्या कामकाजाबद्दल प्रचंड नाराजीचा सूर उमटू लागला आहे. इस्पुर्ली पोलिस ठाण्याच्या पथकाने सोमवारी रात्री दिंडनेर्लीतील ‘व्ही फार्म’ या फार्महाऊसवर छापा टाकला होता. चार महिलांसह दहा जणांना पकडण्यात आले. याप्रकरणी पंधरा संशयितांवर गुन्हाही दाखल झाला आहे. या गुन्ह्यात संशयितांची नावे बदलण्याचा प्रकार समोर आल्याने याची तक्रार थेट पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्याकडे झाली.

Kolhapur Farmhouse Raid
Mumbai News: गणेश विसर्जनाला मोठी गर्दी होणार! मुंबईतील महत्त्वाचे रस्ते वाहतुकीसाठी बंद, मेट्रो सेवेतही बदल; वाचा सविस्तर

याची गांभीर्याने दखल घेत फार्महाऊसमधील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे आदेश देण्यात आले. उपअधीक्षक पवार यांच्याकडे या सर्व प्रकरणाचा तपास सोपविण्यात आला आहे. एक पोलिस उपनिरीक्षक, पाच अंमलदार आणि गोपनीय विभागाचा पोलिस अशांची चौकशी केली जाणार आहे.

कोणाचीही गय केली जाणार नाही ः पवार कारवाई केल्यानंतर त्यामध्ये काही फेरफार केल्याचे आरोप झाले आहेत. या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून, प्रत्यक्षदर्शींचे जबाबही नोंदविण्याचे काम सुरू केले आहे. याची सखोल चौकशी करून अहवाल वरिष्ठांना पाठविला जाईल. दोषींची कसलीही गय केली जाणार नाही, असे करवीर उपअधीक्षक आप्पासो पवार यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com