Israel Tourist Loses Bag: अनोळख्या शहरात बॅग हरवल्याने हतबल झालेल्या इस्राईल युवकाला कोल्हापूरकरांनी दिलेला आधार, जिल्हा पोलिसांच्या २४ तासांच्या तत्पर शोधमोहिमेची साथ आणि स्थानिकांच्या माणुसकीने दिलासा देत नख्मनचा भारतातील अनुभव बदलून टाकणारा आदर्श संदेश जगासमोर आणला.
कोल्हापूर: दुचाकीवरून जाताना वाटेत बॅग पडली. त्यात भाषा काही समजेना. काय झालंय ते सांगता येईना. जवळ पुरेसे पैसेही नव्हते, अशा भेदरलेल्या अवस्थेतील इस्त्राईलचा एकवीस वर्षीय युवक नख्मन याला कोल्हापूरकरांनी आधार दिला.