IT Park Unlikely as Agriculture College Refuses Alternative LandSakal
कोल्हापूर
IT Park:'जमीन पसंत पडेना, आयटी पार्क होईना'; प्रशासनाचा कागदी खेळ, कृषि महाविद्यालयला पर्यायी प्रस्ताव मान्य नाही
Bureaucratic hurdles in setting up rural IT park : सांगरूळ येथील जागा कृषी महाविद्यालयाला मान्य असली तरी सध्या ही जागा वनविभागाच्या अखत्यारित आहे. या जागेचे र्निवनीकरण करणे आवश्यक आहे; पण त्याची प्रक्रिया मोठी असल्याने वेळ लागणार आहे. तुर्तास आयटी पार्कच्या जागेचा प्रश्न ‘जैसे थे’ आहे.
ओंकार धर्माधिकारी
कोल्हापूर: जिल्ह्यातील अनेक प्रलंबित प्रश्नांपैकी एक असणाऱ्या आय.टी.पार्कच्या जागेचा प्रश्न अजूनही कायम आहे. जिल्हा प्रशासनाने कृषी महाविद्यालयाला ज्या पर्यायी जागा दाखवल्या, त्यातील एकही प्रस्ताव कृषी महाविद्यालयाला मान्य नाही. सांगरूळ येथील जागा कृषी महाविद्यालयाला मान्य असली तरी सध्या ही जागा वनविभागाच्या अखत्यारित आहे. या जागेचे र्निवनीकरण करणे आवश्यक आहे; पण त्याची प्रक्रिया मोठी असल्याने वेळ लागणार आहे. तुर्तास आयटी पार्कच्या जागेचा प्रश्न ‘जैसे थे’ आहे.

