
Rajarshi Shahu Chhatrapati Memorial Trust : महाराष्ट्राच्या सामाजिक क्षेत्रातील प्रतिष्ठेचा राजर्षी शाहू पुरस्कार सोमवारी ख्यातनाम दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांना जाहीर झाला. या पुरस्काराचे यंदाचे ३९ वे वर्ष आहे. राजर्षी शाहू महाराज जयंती दिनी म्हणजे २६ जूनला शाहू स्मारक भवन येथे सायंकाळी सहाला पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. एक लाख रुपये, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. यावेळी इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर उपस्थित होते.