Jaggery Price : गुळाची आवक निम्म्याने घटली; महिन्याभरात गुळाचे भाव 200 ते 300 रुपयांनी वाढण्याची शक्यता

यंदाच्या गूळ हंगामासाठी पुरेसे मनुष्यबळ नसल्याने उत्पादन घेण्याला मर्यादा आल्या.
Jaggery Price
Jaggery Priceesakal
Summary

यंदा गेल्यावर्षीच्या तुलनेत दोनशे ते रुपयांनी भाव वाढला आहे. पण, मोजकाच गूळ बाजारात येत आहे.

कोल्हापूर : यंदाच्या गूळ हंगामासाठी पुरेसे मनुष्यबळ नसल्याने उत्पादन घेण्याला मर्यादा आल्या. त्यामुळे बाजारपेठेतील गुळाच्या आवकेत निम्म्याने घट झाली. चांगल्या गुळाची आवक वाढल्यास महिन्याभरात गुळाचे भाव आणखी दोनशे ते तीनशे रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे.

गूळ हंगामासाठी बीड, धाराशीव, लातूर, बार्शी, मंगळवेढा भागातून गुळकरी कामगार येथील गुऱ्हाळ घरांवर आणले जातात. मात्र, पाच वर्षांत कामगार येण्याच्या प्रमाणात दरवर्षी १० ते २० टक्के घट होत आहे. यंदाही जवळपास १५ हजार गुळकरी कामगार येथे आले. तेच जवळपास दीडशे गुऱ्हाळ घरांवर काम करत आहेत.

Jaggery Price
छत्रपती शिवरायांचा लौकिक आणखी वाढणार! ऐतिहासिक विजयदुर्गात होणार 'आरमारी म्युझियम'; 'इतक्या' कोटींचा निधी मंजूर

औरंगाबाद येथे झालेल्या औद्योगिक वसाहतीत गुळकरी कामगारांची नवी पिढी बारमाही नोकरीला जाऊ लागली. त्यामुळे घरच्या पारंपरिक गूळ बनवण्याच्या उद्योगात नवी पिढी फारशी येत नाही, परिणामी मराठवाड्यातून कोल्हापूरला गूळ बनविण्यासाठी येणाऱ्यांमध्ये पन्नाशी पूर्ण केलेले बहुतेक गुळवे किंवा गूळ कामगार येत आहेत. त्यांची एकूण संख्या घटली आहे.

मनुष्यबळ शोधण्यात वेळ गेल्याने यंदाचा गूळ हंगाम सुरू होण्यासाठी पंधरा दिवसांचा उशीर झाला. पूर्वी २४ तासांत चार ते सहा आदणे होत होती. सध्या दोन किंवा तीन आदणे होतात. अपवादात्मक गुऱ्हाळ घरांवर रात्रीचे गूळ उत्पादन घेतले जाते. त्यामुळे एकूण गूळ उत्पादन कमी झाले. त्यामुळे बाजारपेठेतील आवक निम्म्याने घटली आहे.

Jaggery Price
मुंबई-गोवा महामार्गावरुन प्रवास करणाऱ्यांना मोठा दिलासा; कोसळलेल्या 'त्या' उड्डाणपुलावरील लाँचर काढले

यंदा गेल्यावर्षीच्या तुलनेत दोनशे ते रुपयांनी भाव वाढला आहे. पण, मोजकाच गूळ बाजारात येत आहे. त्याचा मोजक्याच शेतकऱ्यांना लाभ होतो. साखरेचे मिश्रण न करता गूळ बनवला तर गुळाला आणखी चांगला भाव मिळणार आहे.

आवक अशी

  • नोव्हेंबर-डिसेंबर २०२२ ः १५ हजार ते २२ हजार गूळ रवे

  • डिसेंबर २०२३ ः १० हजार ते १४ हजार गूळ रवे.

सरासरी दर असे

  • २०२२ ः ४ हजार ते ४ हजार ३००

  • २०२३ ः ४ हजार ५०० ते ४ हजार ६००

  • १ किलो लहान गूळ रवे ः ३ हजार ८०० ते ४ हजार ७००

गूळ बनवण्यासाठी कामगारांची संख्या अपुरी आहे. मजुरी वाढती आहे. वीजपुरवठा, पाणी तसेच खाणपान असा हंगमातील एकूण खर्च गेल्या दहा वर्षांत दुपटीने वाढला. त्यामुळे गुऱ्हाळघर चालवणे जिकिरीचे बनले आहे. तरीही चांगल्या प्रतीचा गूळ बाजारपेठेत आणला जात नाही. त्यामुळे भाव वाढूनही फारसा नफा उरत नाही.

-बाजीराव पाटील, गूळ उत्पादक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com