
कोल्हापूर : यंदाच्या गूळ हंगामात शाहू मार्केट यार्डातील गूळ बाजार पेठेत गुळाची आवक वाढली आहे. सौदे नियमित सुरू आहेत. त्यामुळे गुळाला उठावही चांगला आहे. याचे फलित म्हणून गुळाचा सरासरी भाव ४ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल असा झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत २०० ते ३०० रुपये भाववाढ आहे.