esakal | शिरोळात राजकारणात ट्विस्ट: 'गुड न्युज'च्या फलकाने चर्चेला उधान
sakal

बोलून बातमी शोधा

गुड न्युज

शिरोळात राजकारणात ट्विस्ट: 'गुड न्युज'च्या फलकाने चर्चेला उधान

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जयसिंगपूर (कोल्हापूर) : 'गुड न्युज'चे डिजिटल फलक सध्या शहरात चर्चेचा विषय बनला आहे. शहरातील मोक्याच्या ठिकाणी हे फलक लावले कोणी हे कोणालाच माहीत नसले तरी त्याचे संदर्भ आपापल्या परीने लावले जात आहेत. राजकीय फलकांची जागा 'गुड न्युज' या अनाकलनीय फलकांनी घेत नागरिकांची उत्सुकता ताणली आहे. जिल्हा बँक निवडणूकीच्या निमित्ताने शिरोळ तालुक्याच्या राजकारणात ट्विस्ट आला असताना अशा काळात शहरातील हे फलक कोणते सूचक विधान तर करत नाही ना असाही असाही सूर निर्माण झाला आहे.

हेही वाचा: सोलापूर : वाळू तस्करानं पोलीस कर्मचाऱ्याला चिरडलं; जागीच मृत्यू

शहरात रात्रीत 'गुड न्युज' वाले फलक लागले. सकाळी नागरिकांना याचा कोणताच अर्थबोध झाला नाही. राजकीय राखीव फलकांच्या जागेवर या फलकांनी सध्या शहरात चर्चेचे रान उठविले आहे. शहरात अशा प्रकारचे फलक प्रथमच लागले. कोणत्या कंपनीचे मोठे शो रूम होत नाही की शहरात नवीन काही जाहिरातबाजी करण्यापूर्वीचा हा फंडाही नाही. पितृ पंधरवड्यात असे नवीन काही होईल याची शक्यताही नसताना 'गुड न्युज' फलकांनी शहरात नव्या चर्चेला तोंड फोडले आहे.

जिल्हा बँकेच्या निवडणूकीच्या निमित्ताने शिरोळ तालुक्यातील राजकारण नव्या वळणावर पोहोचले आहे. सोशल मीडियावर आव्हाने दिली जात असताना शहरातील हे फलक जिल्हा बँकेच्या सूचक घडामोडींकडे लक्ष वेधत आहेत. 'गुड न्युज'चा खुलासा होणारे फलक उभारणार का आणि त्याचे संदर्भ काय असतील याची उत्सुकता शहरात ताणली आहे.

loading image
go to top