
जयसिंगपूर : ट्रेंडिग कंपनीमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणूक प्रकरणाची व्याप्ती वाढत आहे. श्रेणीक दत्तात्रय गुरव (मूळ गाव हरोली, ता. शिरोळ, सध्या रा. ग्रीन व्हॉली अपार्टमेंट, स्टेशन रोड, जयसिंगपूर) याच्या विरोधात नव्याने पाच जणांनी ३० लाख ९० हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी जयसिंगपूर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.