esakal | शिरोळ बंधाऱ्यास जलपर्णीचा विळखा 

बोलून बातमी शोधा

Jalparni in Shirol Dam Kolhapur Marathi News

शिरोळ बंधाऱ्याजवळ पंचगंगेच्या दूषित पाण्यामुळे जलचरांना पुन्हा एकदा मरण यातना भोगाव्या लागणार आहेत.

शिरोळ बंधाऱ्यास जलपर्णीचा विळखा 

sakal_logo
By
डी. आर. पाटील

शिरोळ : शिरोळ बंधाऱ्याजवळ पंचगंगेच्या दूषित पाण्यामुळे जलचरांना पुन्हा एकदा मरण यातना भोगाव्या लागणार आहेत. तसेच बंधाऱ्याजवळ पाचशे मीटर परिसरात पंचगंगा नदीला जलपर्णीचा विळखा बसला आहे. प्रत्येक महिन्यास पंचगंगा प्रदूषणाबाबत आढावा घेतला जाईल, असे आश्‍वासन देणाऱ्या प्रशासनास आश्‍वासनांचा विसर पडला आहे. 

दोन महिन्यापूर्वी पंचगंगा नदीमध्ये दूषित पाणी सोडल्याने लाखो मासे मृत्युमुखी पडले होते. यावेळी पंचगंगा बचावासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केल्यानंतर प्रादेशिक प्रदूषण मंडळाचे पदाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांनी पंचगंगा नदी प्रदूषित होणार नाही यासाठी वेळोवेळी पंचगंगा नदीची पाहणी करून प्रत्येक महिन्याला आढावा बैठक घेतली जाईल, असे आश्‍वासन दिले होते.

तथापि गेल्या दोन महिन्यात अशाप्रकारची कोणतीही बैठक प्रशासनाने घेतलेली नाही. दोन दिवसांपासून शिरोळ बंधाऱ्याजवळ जलपर्णीने पंचगंगेला विळाखा दिला आहे. यामुळे नदीपात्रातील जलचर प्राण्यांचा श्‍वास गुदमरत आहे. सोमवारी नदीपात्रातील पाण्यास दुर्गंधी येऊ लागली आहे. यामुळे नजीकच्या काळात नदीपात्रातील जलचर प्राण्यांना त्रास होणार आहे. तसेच या दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्यही धोक्‍यात येणार आहे. 

प्रशासनाने कृती करावी 
शिरोळ बंधाऱ्याजवळ जलपर्णीचा विळखा बसला आहे. प्रत्येक महिन्याला आढावा बैठक घेण्याचे जाहीर करूनही बैठक घेण्यात आली नाही. ही बाब दुर्दैवी आहे. प्रदूषण करणाऱ्या घटकांचा शोध घेऊन योग्य ती कारवाई करावी. तसेच नदीपात्रातील जलपर्णी तत्काळ हटवण्याची आवश्‍यकत आहे. 

कारवाईचा गरज
आढावा बैठक घेण्याचे ठरले होते. तथापि कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असल्याने प्रशासनाने त्यावर लक्ष केंद्रित केले आहे. तथापि प्रदूषण महामंडळ, पाटबंधारे विभाग यांनी या बाबीकडे लक्ष देऊन कारवाई करणे गरजेचे आहे. 
- सौ. अपर्णा मोरे धुमाळ, तहसीलदार, शिरोळ 

संपादन - सचिन चराटी

kolhapur