

Janasurajya Attracts Aspirants Ahead of Civic Polls
sakal
कोल्हापूर : एकेकाळी कोल्हापूर महापालिकेच्या राजकारणात सत्तेत राहिलेल्या जनसुराज्य शक्ती पक्षाकडून आज अचानक इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यात अनेक दिग्गज उमेदवारांनी मुलाखती दिल्या. पक्षाचे संस्थापक आमदार डॉ. विनय कोरे, आमदार अशोकराव माने, प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी या मुलाखती घेतल्या.