esakal | 'मराठा आरक्षणाबाबत तत्काळ मार्ग काढा, अन्यथा वेगळा विचार'
sakal

बोलून बातमी शोधा

'मराठा आरक्षणाबाबत तत्काळ मार्ग काढा, अन्यथा वेगळा विचार'

'मराठा आरक्षणाबाबत तत्काळ मार्ग काढा, अन्यथा वेगळा विचार'

sakal_logo
By
युवराज पाटील

कोल्हापूर : मराठा आरक्षणाबाबत समाजात असंतोष आहे. समाजाची ही खदखद आणि तरूणाईच्या संतापाची वेळीच दखल घ्या. ती घेतली जात नसेल तर वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिला. शिवाजी पेठेतील शिवाजी मंदिर येथे आज शहरातील विविध तालीम संस्था आणि मंडळांच्या बैठकीत ते बोलत होते.

दरम्यान, मराठा आरक्षणासाठी जिल्ह्याची संपूर्ण ताकद खासदार संभाजीराजे यांच्या पाठिशी लावण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. बैठकीला शिवाजी तरूण मंडळाचे अध्यक्ष सुजीत चव्हाण, देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव, माजी स्थायी समिती सभापती अजित राऊत, बाबा पार्टे, दिलीप देसाई, निवासराव साळोखे, बाबा महाडिक, फत्तेसिंह सावंत आदी उपस्थित होते.

हेही वाचा: संभाजीराजेंचा राज्यभर दौरा; मराठा आरक्षणाची पुढची दिशा ठरवणार

संभाजीराजे म्हणाले, 'मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले आहे. गायकवाड आयोग नाकारला असून विषय न्यायप्रविष्ठ आहे. पुर्नयाचिका स्वीकारली जाईल की नाही शंका आहे, अशा स्थितीत मार्ग निघणे गरजेचे आहे. त्यासाठीच राज्याच्या दौऱ्यावर निघालो आहे.' कोल्हापूर शहरातील शिवाजी पेठ, मंगळवार पेठेत जनआंदोलन उभारले की त्याचा वणवा राज्यभर पेटतो. त्याचा अनुभव यापूर्वी अनेकदा राज्यकर्त्यांनी घेतला आहे. त्यामुळे तत्काळ मार्ग काढणे ही सर्वच राजकीय नेत्यांची जबाबदारी असल्याचेही ते म्हणाले.

loading image