Jayant Patil : मोदी सरकारबद्दल सामान्य माणूस, शेतकरी, युवक व महिलांच्यासह समाजाच्या सर्व घटकात प्रचंड चीड; जयंत पाटील

मी संपूर्ण महाराष्ट्रात प्रचारासाठी फिरत आहे. मोदी सरकारबद्दल सामान्य माणूस, शेतकरी, युवक, महिलांच्यासह समाजाच्या सर्व घटकात प्रचंड चीड आहे.
Jayant Patil
Jayant Patilsakal

किल्लेमच्छिंद्रगड: मी संपूर्ण महाराष्ट्रात प्रचारासाठी फिरत आहे. मोदी सरकारबद्दल सामान्य माणूस, शेतकरी, युवक, महिलांच्यासह समाजाच्या सर्व घटकात प्रचंड चीड आहे. राज्यात व देशात महाविकास आघाडीस जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याची भावना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांनी बहे, भवानीनगर आणि किल्लेमच्छिंद्रगड येथील जाहीर सभेत व्यक्त केली. काही मंडळी आपला पक्ष सोडून गेल्याने आपली पार्टी ही देशातील सर्वात स्वच्छ पार्टी झाल्याचा मिश्किल टोलाही त्यांनी दिला.

आ.पाटील यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील (सरूडकर) यांच्या प्रचारार्थ वाळवा तालुक्यात जाहीर सभा घेतल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे अँड.बाबासाहेब मुळीक,विजयराव पाटील,बाळासाहेब पाटील,संजय पाटील,सुस्मिता जाधव,देवराज देशमुख, जयश्री पवार, सुशांत कोळेकर यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते व मतदार सहभागी झाले होते.

आ. पाटील म्हणाले, आपल्या पक्षाने जाहीरनामा प्रसिध्द केला असून आपल्या महाविकास आघाडीची सत्ता आल्यास आपण आरक्षणाची ५० टक्केची मर्यादा काढून टाकणार आहोत. शेती औजारे खरेदी वर असणारा कर काढणार असून जीवनावश्यक व नेहमी वापरातील वस्तूवरील जीएसटी रद्द करणार आहोत. शेती मालाचा हमी भाव निश्चित करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था निर्माण केली जाईल. युवक व गरीब महिलांना वर्षाला एक लाखाचे मानधन दिले जाईल. गॅस सिलेंडरची किंमत ५०० रूपयापर्यंत खाली आणणार आहोत. सत्यजित पाटील हे स्वतः शेतकरी असून त्यांना १० वर्षाचा आमदार म्हणून अनुभव आहे. ते खासदार म्हणूनही प्रभावी जबाबदारी पार पाडतील. त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा.

Jayant Patil
Shirur Loksabha : डॉ. अमोल कोल्हे यांचा अर्ज वैध ; पुणे ४२, शिरूर ३५ अन् मावळ मतदारसंघातून ३५ उमेदवार रिंगणात

राष्ट्रवादी काँग्रेसचे विजयराव पाटील, सौ.सुस्मिता जाधव, संजय पाटील,देवराज देशमुख, सुशांत कोळेकर, राजारामबापू साखर कारखान्याचे संचालक विठ्ठल पाटील, माजी संचालक माणिकराव पाटील, भवानीनगरचे भरत कदम, किल्लेमच्छिंद्रगडचे उपसरपंच बाळासो जाधव, माजी पं.स.सदस्य सुनिल पोळ, राहुल निकम, तानाजी यादव यांचीही भाषणे झाली. हणमंतराव मोरे, भीमराव देशमुख, मारुती मोरे यांचेसह ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. तालुक्यांतील बहे गावचे सरपंच संतोष दमामे, सौ.सुवर्णा पाटील, दिलीपराव देसाई, ॲड. संग्राम पाटील, अविनाश खरात, सिताराम हुबाले, बी.जी. पाटील, शिवाजी पाटील, जयदीप पाटील, मनोज पाटील, भगवान पाटील, वैशाली पाटील, शंकर मोहिते, चंद्रकांत मेहता, जयश्री कदम, अशोक गोडसे, सरपंच इंदूताई ताटे, पंकज पाटील, सिमा पाटील, सौरभ सावंत, यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com