Jayasingpur Crime News
esakal
जयसिंगपूर : उदगाव (ता. शिरोळ) येथे कृष्णा नदीपात्रालगत असलेल्या जॅकवेलजवळ लखन सुरेश घावट ऊर्फ बागडी (वय ३५, रा. मच्छी मार्केट परिसर, जयसिंगपूर) याचा डोके दगडाने ठेचून निर्घृण खून (Jayasingpur Case) केल्याची घटना रविवारी (ता. २६) दुपारी तीनच्या सुमारास घडली. या घटनेने जयसिंगपूर व उदगाव परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आठवड्यात शहरातील दोघांच्या खुनामुळे खळबळ उडाली आहे.