

जयसिंगपूर : जिल्ह्यातील एकमेव ‘ब’ वर्ग असणारी जयसिंगपूर नगरपालिका. अलीकडील काही वर्षांत राजकीय संघर्ष शहराच्या विकासात विघ्न ठरले. पालिकेवर ‘प्रशासक राज’ येण्याआधी पाच वर्षे केवळ सत्तासंघर्ष नागरिकांना पाहायला मिळाला. यातून जयसिंगपूर शहराच्या विकासाचे नागरिकांचे स्वप्न भंगले.