कोल्हापूर : व्यवसायासाठी कर्ज व आलिशान मोटार, बाजारभावापेक्षा कमी किमतीत सोने देण्याचे आमिष दाखवून एका महिलेने जयसिंगपुरातील पुजाऱ्याला ४३ लाख ७४ हजारांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला. याप्रकरणी स्नेहा संजय नारकर (वय ३५, रा. संध्यामठ गल्ली, शिवाजी पेठ) हिला लक्ष्मीपुरी पोलिसांनी अटक केली.