Kolhapur Election: गडहिंग्लज निवडणुकीत ‘ज.द.-भाजप-जनसुराज्य’ आघाडीचे जागावाटप निश्चित; शिंदे शिवसेनेच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष!
Gadhinglaj Politics: आगामी निवडणुकीसाठी आघाडीचे समीकरण भक्कम करण्यासाठी भाजप-जनसुराज्य-ज.द. नेत्यांची एकत्रित मोर्चेबांधणी जोरात सुरू असून, गडहिंग्लजमध्ये या आघाडीचा प्रभाव निर्णायक ठरणार आहे.
गडहिंग्लज: येथील नगरपालिका निवडणुकीसाठी जनता दल, भाजप व जनसुराज्य आघाडीमध्ये जागा वाटपावर एकमत झाल्याचे सांगण्यात आले. कोल्हापूर येथे खासदार धनंजय महाडिक यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत जागा वाटपावर चर्चा झाली.