esakal | डोंगराच्या पायथ्याशी असणारे  सर्व रस्ते बंद : इतिहासात प्रथमच जोतिबावर खेटे भाविकांविना

बोलून बातमी शोधा

jotiba tempal festival closed kolhapur marathi news

उद्या पहिला खेटा 
मंदिर बंद ..भाविकांना प्रवेश नाही ..

डोंगराच्या पायथ्याशी असणारे  सर्व रस्ते बंद : इतिहासात प्रथमच जोतिबावर खेटे भाविकांविना
sakal_logo
By
निवास मोटे

जोतिबा डोंगर (कोल्हापूर) : दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाचे खेटे यंदा इतिहासात प्रथमच भाविकांना होत आहेत .कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे जिल्हाधिकारी दौलत देसाई व देवस्थान व्यवस्थान समितीने हा निर्णय घेतला आहे . भाविकांनी  रविवारी डोंगरावर येऊ नये असे अवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. उद्या (ता .२८ ) पहाटेपासून डोंगराच्या पायथ्याशी असणारे  सर्व रस्ते बंद करण्यात येणार असून सर्वत्र पोलीस बंदोबस्त सज्ज  ठेवण्यात येणार आहे . 

मंदिरात होणारे सर्व धार्मीक विधी करण्यास कमीत कमी मानकरी पुजारी भाविक यांना परवानगी दिली आहे . सोमवार ते शनिवार मंदिर सुरू राहील .सकाळी ७ ते १२ ते दुपारी ३ ते रात्री ८ पर्यंत सुरू राहील .यंदा पाच रविवारी खेटे आहेत. होळी पौर्णिमेच्या दिवशी या सर्व खेटयांची सांगता होणार आहे .

हेही वाचा- अन्यथा जमिनी परत करा; वाशीतील शेतकऱ्यांची झाली फसवणूक

माघ महिन्यात भरणाऱ्या रविवारच्या यात्रेस जोतिबाचे खेटे असे म्हणतात. या खेट्यांचे वैशिठ्ये म्हणजे अख्खं  कोल्हापूर जोतिबा डोंगरावर दर्शनासाठी येते. सर्रास भाविक अनवाणी पायाने डोंगर चढतात . चांगभलच्या जयघोषाने सर्व पायी रस्ते दुमूमून जातात .डोंगर गुलालमय होतो . दरवर्षी ही खेट्याची यात्रा मोठया उत्साहात साजरी होते .गेल्या शेवटचा खेटा झाला आणि कोरोनामूळे मंदिर बंद झाले . त्यानंतर ८ महिने मंदीर झाले. पुन्हा ते दिवाळी पाडव्यास सुरु झाले यंदा खेटयास बंदी घातल्याने अनेकांना फटका बसणार आहे .

यंदा चैत्र यात्रेवर ही सावट

यंदा  कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने २५ एप्रिल रोजी होणाऱ्या चैत्र यात्रेवर कोरोनाचे सावट दिसत

संपादन- अर्चना बनगे