जोतिबा डोंगर : दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाच्या चैत्र यात्रेच्या कालावधीत यंदा सलग शासकीय सुट्या असल्याने यात्रेत (Jyotiba Chaitra Yatra) गर्दीचा उच्चांक होणार आहे. डोंगरावर भाविकांची गर्दी फिरत राहावी यासाठी दुपारी बारा वाजता मानाच्या सासनकाठ्यांची मिरवणूक काढण्यात येणार आहे. तसे नियोजन शासकीय यंत्रणेने केले आहे. पालकमंत्री प्रकाश आबिटकर (Prakash Abitkar) यांना प्रशासनाने बारापूर्वी येण्याचे निमंत्रण दिले आहे.