या खेट्यांच्या निमित्ताने पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने मंदिरातील तयारी सुरू केली असून, ग्रामपंचायतीने सुद्धा स्वच्छता तसेच मुबलक पाणी देण्याची सोय केली आहे.
जोतिबा डोंगर : श्री क्षेत्र जोतिबा डोंगर (ता. पन्हाळा) येथील दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाच्या खेट्यांना येत्या १६ तारखेपासून प्रारंभ होत आहे. यासाठी जोतिबा नगरी सज्ज झाली असून, या खेट्यांसाठी राज्यभरातून लाखो भाविक येतात. माघ महिन्यात जोतिबा (Jyotiba Dongar) देवाचे हे पाच खेटे घातले जातात. या खेट्यांच्या निमित्ताने मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.