esakal | जोतिबा चैत्र यात्रा कडक सुरक्षा व्यवस्थेत; पालखी सोहळ्याला 21 मानकऱ्यांची उपस्थिती

बोलून बातमी शोधा

जोतिबा चैत्र यात्रा कडक सुरक्षा व्यवस्थेत; पालखी सोहळ्याला 21 मानकऱ्यांची उपस्थिती
जोतिबा चैत्र यात्रा कडक सुरक्षा व्यवस्थेत; पालखी सोहळ्याला 21 मानकऱ्यांची उपस्थिती
sakal_logo
By
निवास मोटे

जोतिबा डोंगर (कोल्हापूर) : श्री क्षेत्र जोतिबा डोंगर येथील दख्खनचा राजा जोतिबा चैत्र यात्रेचा आज मुख्य दिवस. पण आजच्या दिवशी डोंगरावर पोलिसांशिवाय कोणीही उपस्थित न्हवते. यात्रेत पालखी सोहळा व्हावा अशी भाविकांची इच्छा होती. २१ मानकऱ्यांच्या उपस्थितीत कडक बंदोबस्तात आजचा यात्रेतील पालखी सोहळा पार पडला. सांयकाळी पाच वाजता देवाची पालखी विविधरंगी फुलांनी सजविण्यात आली. प्रशासनाने पालखी सोहळासाठी उपस्थितीत मानकरी, देवसेवक यांचा कोरोना चाचणीचा रिपोर्ट पाहून त्यांना मंदिरात प्रवेश दिला.

मंदिर परिसरात सहा वाजून एक मिनटांनी प्रवीण डबाणे यांनी तोफेची सलामी दिली. पालखी गजगतीने मूळमाया यमाई मंदीराकडे रवाना झाली. यावेळी प्रांताधिकारी अमित माळी, तहसीलदार रमेश शेंडगे, पोलिस उपअधीक्षक आर. आर. पाटील, देवस्थानचे सचिव विजय पवार, अधिक्षक महादेव दिंडे हे उपस्थित होते. पालखी मार्गावर कडक पोलिस बंदोबस्त होता. मार्गावर एकही पुजारी अथवा ग्रामस्थ यांना बाहेर पडू दिले नाही. केवळ सनई, शिंग, ढोल या वाद्यांच्या गजरात पालखी यमाई मंदिराकडे गेली. विविध धार्मिक विधी झाल्यानंतर पुन्हा पालखी मुख्य मंदिरात आली.

हेही वाचा: आता वाजवा! लग्नाची वरात पोहोचली डायरेक्ट पोलिस स्टेशनच्या दारात

दरम्यान, कोरोना नियमांमुळे डोंगरावर आज गगनाला भिडणाऱ्या, खांद्यावर डोलणाऱ्या, रंगीबेरंगी सातशे सासनकाठया न्हवत्या. चांगभलचा जयघोष नसल्याने परिसर शांत होता. यात्रेच्या मुख्य दिवशी अख्खा डोंगर सूना राहीला. जोतिबा डोंगरावर कालपासून तीन दिवस कडक संचारबंदी लागू करण्यात आली असून डोंगरावर येणाऱ्या कुशीरे, पोहाळे, गिरोली, दाणेवाडी या भागातील वाटा बंद करण्यात आल्या आहेत. कालपासून डोंगरावर चाळीस ठिकाणी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. पोलिसांमुळे डोंगराला छावणीचे स्वरुप प्राप्त झाले आहे.

आज पहाटे पाच वाजता मुख्य मंदिरात पन्हाळ्याचे तहसीलदार रमेश शेंडगे यांच्या हस्ते शासकीय अभिषेक झाला. यावेळी देवस्थान समितीचे अधीक्षक महादेव दिंडे यांच्यासह मोजकेच पुजारी उपस्थित होते. सकाळी आठ वाजता राजेशाही थाटातील बैठी आकर्षक महापूजा बांधण्यात आली. दरम्यान १२१ वर्षानंतर भाविकांवीनाच चैत्र यात्रा दुसऱ्यांदा होत आहे. या पूर्वी १८९९ मध्ये प्लेगच्या साथीमुळे डोंगरावर चैत्र यात्रा झाली नव्हती. मंदिर गेल्या वीस पंचवीस दिवसांपासून बंद आहे. कोणत्याही बाहेरील भाविकांना मंदिरात प्रवेश नाही. कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाने चैत्र रद्द केली. दरवर्षी यात्रा काळात डोंगरवर भाविकांची गर्दी, गुलाल-खोबऱ्याची उधळण असायची. परंतु गेल्यावर्षीपासून कोरोनामुळे हे चित्र बदलले आहे.

हेही वाचा: कर्नाटकातही 14 दिवस Lockdown, उद्यापासून अंमलबजावणी