esakal | जोतिबाचा पालखी सोहळा होणार २१ मानकऱ्यांच्या उपस्थीतीतच

बोलून बातमी शोधा

null

जोतिबाचा पालखी सोहळा होणार २१ मानकऱ्यांच्या उपस्थीतीतच

sakal_logo
By
निवास मोटे : सकाळ वृत्तसेवा

जोतिबा डोंगर (कोल्हापूर) : श्री क्षेत्र जोतिबा डोंगर ता. (पन्हाळा ) येथील दख्खनचा राजा जोतिबा देवाची चैत्र यात्रा २६ एप्रिल रोजी भाविकाविना संपन्न होत आहे. या दिवशी सांयकाळी साडेपाच वाजता होणारा पालखी सोहळा फक्त २१ मानकऱ्यांच्या उपस्थीतच नेहमीच्या पायरी टप्याने काढण्यासाठी आज जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी परवानगी दिली.

यंदा कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे जिल्हा प्रशासनाने यंदा ही चैत्र यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला. परंतु या यात्रेचा प्रमुख धार्मिक विधी असणारा पालखी सोहळा गेल्या वर्षी पारंपरिक पद्धतीने न करता टेंपोतून पालखी ठेवून ती थेट यमाई मंदिराकडे नेहली होती . त्यामुळे ग्रामस्थ पुजारी भाविकांतून याबाबत मोठी नाराजी होती. कारण पालखी मार्गावर होणारे धार्मीक विधीच करता आले नाहीत. जोतीबावरील ग्रामस्थांनी यावर्षी होणारा पालखी सोहळा सोशल डिस्टनसिंगचे सर्व नियम पाळून पारंपरिक पद्धतीने पायरी टप्पा मार्गावरूनच काढण्यात यावा अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. यासंदर्भात जोतिबा डोंगरावर शाहूवाडी उपविभागीय अधिकारी अमित माळी, तहसीलदार रमेश शेंडगे , करवीर शाहूवाडीचे पोलीस उपअधिक्षक आर.आर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक घेण्यात आली होती.

हेही वाचा- गोठ्यात राबणाऱ्या माता-भगिनींना सोन्याची भाऊबीज; बंटी, मुश्रीफ या दोन भावांकडून वचन

आज याच संदर्भात शाहूवाडी - पन्हाळ्याचे आमदार विनय कोरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन ग्रामस्थांच्या मागणीचा जोर धरला होता. ग्रामस्थांच्या मागणीनंतर कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी पारंपरिक पद्धतीने पालखी सोहळा करण्यास परवानगी दिली आहे. यासाठी फक्त २१ मानकरीच पालखी बरोबर उपस्थित राहतील अशी अट घातली आहे. आज दुपारी कोल्हापूरात जिल्हाधिकाऱ्यांच्या समवेत काही ग्रामस्थ पुजारी गावकर प्रतिनिधी यांची बैठक त्यात चर्चा होऊन हा निर्णय झाला . त्यानंतर सांयकाळी जोतिबा डोंगरावर जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या सूचनेनुसार प्रांताधिकारी अमित माळी यांनी ग्रामस्थ पुजारी मानकरी ग्रामपंचायत देवस्थान समिती यांची बैठक घेऊन पालखी सोहळ्याबाबत चर्चा व नियोजन केले.

दरम्यान,शनिवार ते मंगळवार पर्यंत जोतिबा डोंगरावर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात येणार असल्याचे पोलीस उपअधिक्षक आर आर पाटील यांनी सांगीतले. आजच श्री पाटील यांनी डोंगरावर पाहाणी करुन बंदोबस्ताचे नियोजन केले.डोंगरावर येण्यासाठी भाविकांना पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.

Edited By- Archana Banage