जोतिबाच्या मूळ मूर्तीचे जतन करण्यासाठी पुरातत्त्व विभागाने ही संवर्धन प्रक्रिया राबविली. मंगळवार ते शुक्रवार या चार दिवसांत ही संवर्धन प्रक्रिया पूर्ण केली.
जोतिबा डोंगर : श्री क्षेत्र वाडी रत्नागिरी तथा जोतिबा डोंगर (ता. पन्हाळा) येथील जोतिबा मूर्तीची (Jyotiba Dongar) संवर्धन प्रक्रिया काल चार दिवसांनंतर पूर्ण झाली. आज, शनिवारी सकाळी सात वाजून पाच मिनिटांनी श्रींच्या मुख्य पुजाऱ्यांच्या हस्ते मूर्ती प्राणप्रतिष्ठापना विधी करण्यात आली. त्यानंतर धार्मिक विधी झाल्यानंतर मूर्ती दर्शनासाठी खुली ठेवण्यात आली.