कोल्हापुरात आता होणार कबड्डी मॅटची चौकशी ; अध्यक्ष, सीईओंच्या बैठकीत निर्णय

kabaddi mat fraud meeting in zilla parishad with CEO in kolhapur
kabaddi mat fraud meeting in zilla parishad with CEO in kolhapur

कोल्हापूर : गेली दोन वर्षे जिल्हा परिषदेच्या बदनामीस कारणीभूत ठरलेल्या कुस्तीच्या मॅटवर आज अधिकारी, पदाधिकारी यांनी पडदा टाकला. ही मॅट बदलण्यास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. मात्र यात केवळ पुरवठादारावर कारवाई करुन सोयीस्कररित्या शिक्षण विभागाला बाजुला ठेवण्यात आले आहे. एकाबाजुला शिक्षण विभागाला वाचवण्याचा हा प्रयत्न असल्याची तक्रार करतानाच सदस्यांनी कबडडीच्या मॅटचीही चौकशी करण्याची मागणी लावून धरली. त्यास अध्यक्ष बजरंग पाटील व मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी ग्रीन सिग्नल दिला. त्यामुळे कबडडी मॅटची चौकशी कोणाच्या अंगलट येणार, यावर चर्चा सुरु झाली आहे. 

कुस्तीच्या मॅटवरुन मागील दोन वर्षात सर्वसाधारण सभेत आणि विविध समितींच्या बैठकीत हामरीतमुरी सुरु आहे. मात्र हा विषय निकालात निघाला नाही. चौकशी समितीच्या अहवालाच्या आधारे या प्रकरणी फौजदारी गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. या सर्व पार्श्‍वभूमीवर मुलांच्या सरावाच्या प्रश्‍न मिटावा या उद्देशाने कुस्तीची मॅट बदलण्याची तयारी पुरवठादाराने दर्शवली आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेत कुस्ती मॅट देण्यात आली. यावेळी कुस्ती तज्ञांसह बांधकाम सभापती हंबीरराव पाटील, शिक्षण सभापती प्रवीण यादव, समाजकल्याण सभापती स्वाती सासणे, सदस्य विजय बोरगे, राजवर्धन निंबाळकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव, प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे उपस्थित होत्या. 

सध्या उपलब्ध झालेले मॅटहे कुस्तीचे असल्याचे आणि ते योग्य असल्याचे तज्ञांनी सांगितले आहे. त्यानुसार आता या मॅटचे 72 नग दिले जाणार आहेत. यातील निवडक नग तपासणीस पाठवले जाणार असल्याचे सांगण्यात आले. यावर बोरगे व निंबाळकर यांनी कबडडी मॅटच्या चौकशीचे काय झाले,अशी विचारणा केली. प्रत्येक सभेत या चौकशीची मागणी केली होती मात्र चौकशी न झाल्याचे बोरगे यांनी सांगितले. या सर्व चर्चेची व सदस्यांच्या मागणीची दखल घेत कबडडीच्या मॅटची चौकशी करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. 

"एक मॅट बदलून दिलेले आहे. दुसऱ्या मॅटची चौकशी सुरु आहे. या चौकशीतून कोणीही सुटणार नाही. आम्ही कोणालाही पाठिशी घालणार नाही. जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होणारच."

- बजरंग पाटील, अध्यक्ष

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com