Officials and community leaders
sakal
कोल्हापूर
Objectionable Flag : सात तासांच्या ठिय्या आंदोलनानंतर कबनूरमधील आक्षेपार्ह झेंडा हटला; प्रशासनाच्या मध्यस्थीने अखेर शांततेचा मार्ग मोकळा!
Dispute Resolved : कबनूरमध्ये गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या आक्षेपार्ह झेंड्याच्या वादाला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. सात तास चाललेल्या ठिय्या आंदोलनानंतर प्रशासनाने पुढाकार घेत संयुक्त बैठक बोलावली आणि सर्वानुमते झेंडा हटवण्याचा निर्णय घेण्यात आला.
इचलकरंजी : कबनूर मुख्य चौकात लावलेल्या आक्षेपार्ह झेंड्याबाबत अखेर तोडगा काढण्यात आला. हा झेंडा काढून संबंधितांनी आपल्या धार्मिकस्थळी विनाआक्षेपार्ह मजकूर असलेला झेंडा लावावा, असा एकमुखी निर्णय प्रांताधिकारी दीपक शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

