कोल्हापूर : जनता दल, शिवसेना, काँग्रेस, स्वाभिमानी पक्ष ते पुन्हा शिवसेना ठाकरे गट असा राजकीय प्रवास केलेले कागलचे माजी आमदार संजय घाटगे (Sanjay Ghatge) यांच्यासह त्यांचे पुत्र ‘गोकुळ’चे संचालक अंबरिशसिंह घाटगे हे मंगळवारी (ता. १५) भारतीय जनता पक्षात प्रवेश करत आहेत. पक्षाच्या मुंबईतील कार्यालयात दुपारी तीन वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार आहे.