

Scattered Temporary Bus Stops
sakal
कागल : गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या कागल बसस्थानकाच्या नूतनीकरण कामाचा फटका अखेर थेट प्रवाशांना बसला आहे. स्थानकासमोरील भागाचे काँक्रिटीकरण सुरू झाल्याने मंगळवारपासून कागल बसस्थानक पूर्णपणे बंद ठेवण्यात आले आहे. मात्र, कोणतीही सुस्पष्ट व एकत्रित पर्यायी व्यवस्था नसल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत असल्याचे चित्र दिसत आहे.