

Kagal Check Post Accident point
esakal
Kagal Check Post Accident Point : (नरेंद्र बोते) : कागल येथील नवीन सीमा तपासणी नाक्यावर अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. आज पुन्हा झालेल्या भीषण अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर अवघ्या दोन दिवसांपूर्वी घडलेल्या अपघातातही एका व्यक्तीला जीव गमवावा लागला होता. या सततच्या दुर्घटनांमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.